• १७ वा कबड्डी दिन २०१७

  “खेळाडूंच्या क्रीडा गुणांना वाव देण्याचा पाया बुवा साळवी यांनी रचला. बुवांच्या या सेवेचा गौरव म्हणून आपण कबड्डी दिन साजरा करतो.” असे उदगार महाराष्ट्र कबड्डी दिनाच्या निमित्ताने माजी उपमुख्यमंत्री व राज्य कबड्डी संघटनेचे आजीवन अध्यक्ष अजितदादा पवार यांनी काढले. कबड्डीत आज गेहलोत कुटुंबाचा हस्तक्षेप वाढत चालला आहे. कबड्डीच्या निमित्ताने त्या सर्वांचे वर्षभर पर्यटन सुरू असते. यावर विचार करण्याची वेळ आलेली आहे. विचारमंथन हे फक्त कार्यक्रमापूरते असू नये, तर त्याचा पाठपुरावा केला गेला पाहिजे. गेल्या तीन चार वर्षांत कबड्डीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. राष्ट्रीय स्तरावर आपले स्थान काय? आपण यात मागे पडतो की काय? आपला स्तर उंचविण्याची वेळ आलेली आहे. असे पुढे…

 • कु. अभिलाषा म्हात्रे यांना राष्ट्रीय मानाचा “अर्जुन पुरस्कार”

  महाराष्ट्राची आघाडीची खेळाडू  कु. अभिलाषा म्हात्रे यांना राष्ट्रीय मानाचा “अर्जुन पुरस्कार” नवी दिल्लीत प्रदान महाराष्ट्राची आघाडीची खेळाडू व नवी मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाच्या क्रीडा अधिकारी आणि आंतरराष्ट्रीय महिला कबड्डीपटू कु. अभिलाषा म्हात्रे यांना केंद्रीय क्रीडा  मंत्रालयाच्या वतीने आज राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून क्रीडा क्षेत्रातील मानाचा “अर्जुन पुरस्कार” भारत देशाचे महामहीम राष्ट्रपती श्री. प्रणव मुखर्जी यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला. श्रीम. अभिलाषा म्हात्रे यांनी सन 2012 च्या महिला विश्वचषक स्पर्धेत तसेच 2014 च्या आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक विजेत्या भारतीय महिला कबड्डी संघात उत्तम खेळ करीत भारत देशाचे प्रतिनिधित्व केले होते. या राष्ट्रीय सन्मानाबद्दल महाराष्ट्र राज्य कब्बडी असोसिएशनचे सर्व पदाधिकारी व सर्व…

 • १५ वा कबड्डी दिन २०१५

  ‘कबड्डी’ला आॅलम्पिकची दारे खुली व्हावी- कुलगुरू डॉ़ चोपडे कै़ साळवी यांच्या कतृर्त्वामुळे भारतात कबड्डीला महत्व मिळाले़ प्राचीन काळात ‘हूतूतू’ नावाचे ओळख असलेल्या या खेळाचे त्यांच्या प्रयत्नाने ‘कबड्डी’त रुपांतर झाले़ सध्या ३५ देशात हा खेळ सुरू आहे़ आणखी १५ देशांत हा खेळ सुरू झाल्यास आॅलम्पिकची दारे खुली होतील़ आॅलम्पिकमध्ये या खेळाचा समावेश होण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे़ असे झाल्यास महाराष्ट्राच्या दृष्टीने ही मोठी घटना ठरू शकेल, असे प्रतिपादन डॉ़ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ़ बी़ ए़ चोपडे यांनी केले़. कबड्डी महर्षी शंकरराव (बुवा) साळवी यांच्या जन्मदिन अर्थात कबड्डी दिनाचे औचित्य साधत महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन, जालना जिल्हा कबड्डी असोसिएशन आणि निर्मल क्रीडा व समाज प्रबोधन ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने १५…

 • पहिली महाकबड्डी लीग २०१५

  ठाणे टायगर्स – विजेता संघ ठाणे टायगर्स संघाने पहिल्या महाकबड्डी लीगमधील पुरुष आणि महिला गटाचे विजेतेपद पटकावून डबल धमाका केला. म्हाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडानगरीत झालेली पुरुष गटाची अंतिम लढत रंगतदार झाली. या लढतीत ठाणे टायगर्स संघाने सांगली रॉयल्सला चुरशीच्या सामन्यात ३८-३६ असा दोन गुणांनी पराभव केला. महेश मगदूम, सागर वडार, आनंद पाटील यांच्या चढाया आणि कृष्णा मदने व रोहित बने यांच्या पकडींच्या जोरावर सांगली रॉयल्सने मध्यंतराला १६-१३ अशी आघाडी घेतली होती. मात्र, मध्यंतरानंतर निलेश साळुंखे, सुरज देसाई, सुरज बनसोडे यांच्या खेळाच्या जोरावर ठाणे टायगर्सने कडवी झुंज दिली व सामन्यातील पिछाडी भरुन काढली. अखेरच्या टप्प्यात ३६-३६ अशी बरोबरी असताना ठाणे टायगर्सचा…

ठळक बातमी

राष्ट्रीय कबड्डीपटू अशोक कोंढरेंचे निधन

राष्ट्रीय कबड्डीपटू अशोक कोंढरे यांचे मंगळवारी प्रदिर्घ आजाराने निधन झाले. ते 69 वर्षांचे होते. त्यांच्या मागे दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे. कोंढरे यांना गेल्या काही वर्षापासून मधुमेहाचा त्रास होता. काही दिवसांपूर्वी त्यांचा हा त्रास अधिकच बळावला. त्यांच्या मूत्रपिंडाला सूज आली होती. उपचार सुरू असतानाच दोन दिवसांपूर्वी त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यामुळे त्यांची प्रकृति अधिकच खालावली. अखेरीस मंगळवारी रात्री त्यांनी अखेरचा श्‍वास घेतला. कबड्डीच पण, प्रत्येकवेळी ती वेगळ्या पद्धतीने खेळायची कोंढरे यांची खासियत होती. पुण्यातील राणाप्रताप संघाकडून खेळताना त्यांनी कबड्डीची अनेक मैदाने गाजवली. उंची आणि ताकद याच सुरेख समतोल साधणाऱ्या कोंढरे यांची प्रत्येक चढाई वेगळी ठरायची. त्यामुळे प्रतिस्पर्ध्यामध्ये…

“मास्टर दुबई कबड्डी स्पर्धा – २०१८” भारतीय कबड्डी संघ जाहीर

गिरीश इरनाक, रिशांक देवाडीगा या दोन महाराष्ट्राच्या खेळाडूंची भारतीय कबड्डी संघात निवड. दुबई येथे दि. २२  ते ३० जून २०१८ या कालावधीत होणाऱ्या ” मास्टर दुबई कबड्डी” स्पर्धेकरिता भारतीय हौशी कबड्डी महासंघाने आज आपला १४ जणांचा  पुरुषांचा संघ जाहीर केला. या स्पर्धेत भारतासह पाकिस्तान, इराण, श्रीलंका, इंडोनेशिया, जपान, कोरिया या नामवंत देशाचे संघ सहभागी होणार आहेत. महाराष्ट्राच्या गिरीश इरनाक व रिशांक देवाडीगा या दोघांची या चमूत निवड करण्यात आली आहे. ११वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर आपल्या नेतृत्वाने व आक्रमक चढायांनी महाराष्ट्राला राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेचे विजेतेपद मिळवून देणाऱ्या या खेळाडूला प्रो-कबड्डीच्या या ६व्या हंगामात एक करोड अकरा लाख रुपयांची विक्रमी बोली लागली होती….

६५वी पुरुष व महिला राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा – हैद्राबाद – २०१७-१८

पुरुषांत महाराष्ट्रा अजिंक्य! सातव्यांदा मिळविले अजिंक्यपद. महाराष्ट्राने “६५व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत” पुरुष गटात गतविजेत्या सेनादलाचा चुरशीच्या लढतीत ३४-२९असा पराभव करीत जेतेपदावर आपले नाव कोरले. आतापर्यंत महाराष्ट्राने या स्पर्धेत ६विजेतेपदे मिळविली होती. हे सातवे जेतेपद. स्पर्धेच्या इतिहासात २०वेळा महाराष्ट्राने अंतिम फेरीत धडक दिली होती. १३वेळा आपल्याला उपविजेत्यापदावर समाधान मानावे लागले होते. २००७साली अमरावती(विदर्भ कबड्डी असो.)येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राने जितेश जोशीच्या नेतृत्वाखाली दिल्लीला धूळ चारत विजय साजरा केला होता.त्यानंतर आज रिशांक देवाडीगाच्या कल्पक नेतृत्वाखाली बलाढ्य सेनादलाला चीतपट करीत महाराष्ट्र हा आनंदोत्सव साजरा करीत आहे. महाराष्ट्राच्या पुरुष संघाने महाराष्ट्रातील तमाम कबड्डी शौकिनांना दिलेली नवर्षाची अनोखी भेटच म्हणावे लागेल. महाराष्ट्राने सामन्याची सुरुवातच जोरदार…

६५वी पुरुष व महिला राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा – २०१७

मुं. उपनगरच्या महिलांनी पुण्याची अकरा वर्षांची विजयी परंपरा खंडित करीत “पार्वतीबाई सांडव चषकावर” नांव कोरले. पुण्याच्या पुरुषानी मात्र ” श्रीकृष्ण करंडक ” सलग दुसऱ्या वर्षी आपल्याकडे राखण्यात यश मिळविले. महाराष्ट्र राज्य कबड्डी असो. व सातारा जिल्हा कबड्डी असो. च्या मान्यतेने लिबर्टी मजदूर संघाने “६५व्या पुरुष व महिला गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेचे” आयोजन केले होते. पावसाच्या व्यत्ययामुळे रद्द झालेले उपांत्य फेरीचा पुरुषांचा एक व दोन अंतिम सामने आज खेळविण्यात आले. महिलांच्या अंतिम सामन्यात मुंबई उपनगरने पुण्याची अकरा वर्षांची विजयी परंपरा खंडित करीत ३०-२३ असा विजय मिळवीत ” पार्वतीबाई सांडव चषक” आपल्या नावे केला. या विजयासाठी त्यांना फार प्रतीक्षा…

४४ वी राष्ट्रीय कुमार/कुमारी गट कबड्डी अजिंक्यपद स्पर्धा २०१७ कटक-ओडिसा

महाराष्ट्राच्या दोन्ही संघांनी साखळीत उत्तम खेळ करून सर्व सामने जिंकले व गटात विजयी राहिले, तसेच बाद फेरीत उपउपांत्यपूर्व आणि उपांत्यपूर्व सामने जिंकून स्पर्धेत चांगली कामगिरी केली. पण उपांत्य फेरीत महाराष्ट्रच्या दोन्ही संघाचं आव्हान संपुष्टात आले. महाराष्ट्राच्या दोन्ही संघाचे चषका सह छायाचित्र (३रा स्थान)

loading