राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेकरिता महाराष्ट्राचे संघ जाहीर महेंद्र राजपूत आणि किशोरी शिंदे ह्यांच्याकडे धुरा

बंगळुरू येथे २४ नोव्हेंबरपासून होणाऱ्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेकरिता महाराष्ट्राच्या संघाची घोषणा करण्यात आली असून, महेंद्र राजपूतकडे पुरुष संघाचे तर किशोरी शिंदेकडे महिला संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. १६ सदस्यीय हा संघ आष्टी (बीड) येथे सराव करत असून, चार दिवसांनंतर अंतिम १२ जणांच्या संघाची निवड करण्यात येणार आहे. पुरुष संघ : कर्णधार महेंद्र राजूपत (धुळे), काशिलिंग आडके, भागेश भिसे (सांगली), रिशांक देवाडिगा, सय्यद जहागीर, नामदेव इस्वलकर (उपनगर), विराज लांडगे, गोकुळ शितोळे, विकास काळे (पुणे), नीलेश साळुंके, उमेश म्हात्रे (ठाणे), विशाल माने (मुंबई), सतीश खांबे, स्वप्निल शिंदे (रत्नागिरी), राजेंद्र देशमुख (रायगड), मयुर मोटे (बीड). मार्गदर्शक : डॉ. माणिक राठोड, व्यवस्थापक : मनोहर…

Read More

27 व्या किशोर व किशोरी गट निवड चाचणी व अजिंक्यपद स्पर्धा

सांगली : येथील तरूण भारत क्रीडांगणावर सुरू असलेल्या 27 व्या किशोर व किशोरी गट निवड चाचणी व अजिंक्यपद स्पर्धेत किशोर गटात पावसामुळे अंतिम सामन्याचा निकाल न लागल्याने मुंबई उपनगर व सांगली संघाना संयुक्त विजेते पद देण्यात आले. व किशोरीगटात  मुंबई उपनगर संघाने विजेतेपद व अहमदनगर संघाने उपविजेते पद पटकाविले. किशोर गट अत्यंत अटितटीच्या केळला गेलेल्या सामन्यात मद्यंतराला मुंबई उपनगर संघाकडे 7-3 अशी आघाडी होती. मात्र हा सामना निर्धारित वेळेत 10-10 अशा समान गुणांवर संपला. दरम्यानच्या काळात पावसाचा जोर वाढल्याने सामना मैदानावर खेवळविता येत नव्हता. याकारणाने राज्य संघटनेचे सचिव संभाजी पाटील व स्पर्धा निरिक्षक उत्तम माने आणि आयोजकांनी निर्णय घेऊन स्पर्देचे…

Read More

मुंबई उपनगर, पुणे संघांना जेतेपद

राज्य अजिंक्यपद कबड्डी यंदा गेल्या वर्षाचीच पुनरावृत्ती बीड, महाराष्ट्र राज्य कबड्डी असो.च्या वतीने बीड जिल्हा कबड्डी असो. व शेतकरी शिक्षण संस्था प्रसारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ६२ व्या राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत मुंबई उपनगरने पुरुषांत सलग दुसर्‍या वर्षी तर पुण्याने महिलांत सलग नवव्यांदा विजेतेपदाला गवसणी घातली. आष्टी (बीड) येथील पंडित नेहरू विद्यालयाच्या क्रीडांगणावर संपन्न झालेल्या महिलांच्या अंतिम सामन्यात पुण्याने मुंबई उपनगराचा ३६.१५ असा पराभव करीत सलग आठव्यांदा या गटावर आपले वर्चस्व राखले. या विजयाबरोबरच त्यांनी पार्वतीबाई सांडव चषक पटकाविला. मध्यंतरापर्यंत ११-१० अशी नाममात्र आघाडी घेणार्‍या पुण्याने नंतर मात्र आक्रमक धोरण स्वीकारत हा विजय सोपा केला….

Read More

रेल्वेच्या खेळाडूंना महाराष्ट्राच्या संघात संधी

अटींची पूर्तता करणाऱ्या खेळाडूंना महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार आहे. महाराष्ट्र राज्य कबड्डी संघात यापुढे रेल्वेच्या खेळाडूंना समावेश करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय नुकत्याच सांगली येथे झालेल्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. मात्र राज्य संघटनेच्या नियम आणि अटींची पूर्तता करणाऱ्या खेळाडूंना महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार आहे. गेली कित्येक वष्रे रेल्वेकडून खेळणाऱ्या व राष्ट्रीय स्पध्रेसाठी उत्तम खेळूनदेखील रेल्वेच्या संघात निवड न होणाऱ्या खेळाडूंना महाराष्ट्राच्या संघात निवड करण्याची मागणी सातत्याने होत होती. पण काही जिल्हा संघटनांचा विरोध असल्यामुळे हे शक्य होत नव्हते. मात्र रेल्वेच्या गुणी खेळाडूंना महाराष्ट्राच्या संघात नियमांची पूर्तता करून स्थान देण्याचे कार्यकारी मंडळाच्या बैठकीत मान्य करण्यात आले. महाराष्ट्राच्या वरिष्ठ पुरुष आणि…

Read More

कु. अभिलाषा म्हात्रे यांना राष्ट्रीय मानाचा “अर्जुन पुरस्कार”

महाराष्ट्राची आघाडीची खेळाडू  कु. अभिलाषा म्हात्रे यांना राष्ट्रीय मानाचा “अर्जुन पुरस्कार” नवी दिल्लीत प्रदान महाराष्ट्राची आघाडीची खेळाडू व नवी मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाच्या क्रीडा अधिकारी आणि आंतरराष्ट्रीय महिला कबड्डीपटू कु. अभिलाषा म्हात्रे यांना केंद्रीय क्रीडा  मंत्रालयाच्या वतीने आज राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून क्रीडा क्षेत्रातील मानाचा “अर्जुन पुरस्कार” भारत देशाचे महामहीम राष्ट्रपती श्री. प्रणव मुखर्जी यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला. श्रीम. अभिलाषा म्हात्रे यांनी सन 2012 च्या महिला विश्वचषक स्पर्धेत तसेच 2014 च्या आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक विजेत्या भारतीय महिला कबड्डी संघात उत्तम खेळ करीत भारत देशाचे प्रतिनिधित्व केले होते. या राष्ट्रीय सन्मानाबद्दल महाराष्ट्र राज्य कब्बडी असोसिएशनचे सर्व पदाधिकारी व सर्व…

Read More

१५ वा कबड्डी दिन २०१५

‘कबड्डी’ला आॅलम्पिकची दारे खुली व्हावी- कुलगुरू डॉ़ चोपडे कै़ साळवी यांच्या कतृर्त्वामुळे भारतात कबड्डीला महत्व मिळाले़ प्राचीन काळात ‘हूतूतू’ नावाचे ओळख असलेल्या या खेळाचे त्यांच्या प्रयत्नाने ‘कबड्डी’त रुपांतर झाले़ सध्या ३५ देशात हा खेळ सुरू आहे़ आणखी १५ देशांत हा खेळ सुरू झाल्यास आॅलम्पिकची दारे खुली होतील़ आॅलम्पिकमध्ये या खेळाचा समावेश होण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे़ असे झाल्यास महाराष्ट्राच्या दृष्टीने ही मोठी घटना ठरू शकेल, असे प्रतिपादन डॉ़ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ़ बी़ ए़ चोपडे यांनी केले़. कबड्डी महर्षी शंकरराव (बुवा) साळवी यांच्या जन्मदिन अर्थात कबड्डी दिनाचे औचित्य साधत महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन, जालना जिल्हा कबड्डी असोसिएशन आणि निर्मल क्रीडा व समाज प्रबोधन ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने १५…

Read More

पश्चिम विभागीय कबड्डी स्पर्धा – २०१५

महाराष्ट्राच्या पुरुष संघाला जेतेपद! महिलांचा संघ मात्र तिसर्‍या स्थानावर घसरला. महाराष्ट्राच्या पुरुष संघाने पश्चिम विभागीय कबड्डी स्पर्धेत अंतिम विजेतेपदाला गवसंणी घातली. तर महिलांची मात्र तिसर्‍या स्थानावर घसरण झाली. भारतीय कबड्डी महासंघाच्या मान्यतेने छत्तीसगड़ राज्य कबड्डी असो.ने राजनद येथील दिग्विजय क्रीड़ा संकुलात आयोजित केलेल्या पुरुषांच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राने यजमान छत्तीसगडचे आव्हान 59–21 असे सहज परतवुन लावत विजेतेपदाची किमया साधली. सामन्याच्या सुरवातिपासूनच धारदार आक्रमण करीत महाराष्ट्राने सामन्यावर वर्चश्व राखले. प्रो-कबड्डी स्टार काशिलिंग आडके, महेंद्र रजपूत यांच्या झंझावाती आक्रमनाला छ्त्तीगड़ संघाकडे उत्तर नव्हते.मध्यताराला 30–10 अशी मोठी आघाडी महाराष्ट्राकडे होती. यावरून महाराष्ट्राच्या झंझावाताची कल्पना येते. विराज लांडगे, विकास काले, रविन्द्र कुमावत यांनी त्यांना चढ़ाई-पकडीत तोला-मोलाची साथ दिल्यामुळेच महाराष्ट्राला…

Read More

पहिली महाकबड्डी लीग २०१५

ठाणे टायगर्स – विजेता संघ ठाणे टायगर्स संघाने पहिल्या महाकबड्डी लीगमधील पुरुष आणि महिला गटाचे विजेतेपद पटकावून डबल धमाका केला. म्हाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडानगरीत झालेली पुरुष गटाची अंतिम लढत रंगतदार झाली. या लढतीत ठाणे टायगर्स संघाने सांगली रॉयल्सला चुरशीच्या सामन्यात ३८-३६ असा दोन गुणांनी पराभव केला. महेश मगदूम, सागर वडार, आनंद पाटील यांच्या चढाया आणि कृष्णा मदने व रोहित बने यांच्या पकडींच्या जोरावर सांगली रॉयल्सने मध्यंतराला १६-१३ अशी आघाडी घेतली होती. मात्र, मध्यंतरानंतर निलेश साळुंखे, सुरज देसाई, सुरज बनसोडे यांच्या खेळाच्या जोरावर ठाणे टायगर्सने कडवी झुंज दिली व सामन्यातील पिछाडी भरुन काढली. अखेरच्या टप्प्यात ३६-३६ अशी बरोबरी असताना ठाणे टायगर्सचा…

Read More

हार्दिक अभिनंदन !

इन्चॉन कोरीया येथे झालेल्या १७व्या आशियाई क्रिडा स्पर्धेतील कबड्डीत भारताच्या पुरुष संघाने सलग ७वे तर महिला संघाने सलग दुसरे विजेतेपद मिळवित सुवर्ण पदकावर नाव कोरले. या पुरुष व महिला विजेत्या संघाचे व त्यांच्या प्रशिक्षकांचे महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटना व महाराष्ट्रातील तमाम कबड्डी परिवाराकडून हार्दिक अभिनंदन !

Read More

आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या मदने, अभिलाषा, किशोरीची निवड

आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी कबड्डी संघाची घोषणादक्षिण कोरियातील इन्चॉन येथे होणार्‍या आशियाई क्रीडा स्पर्धेतील कबड्डीसाठी निवडण्यात आलेल्या भारतीय संघात महाराष्ट्राच्या तीन खेळाडूंची निवड झाली आहे. या खेळाडूंत नितीन मदने, अभिलाषा म्हात्रे व किशोरी शिंदे यांचा समावेश आहे.भारतीय हौशी कबड्डी फेडरेशनच्या अध्यक्षा मृदुला भदोरिया यांनी या स्पर्धेसाठी पुरुष व महिला संघांची घोषणा केली. गेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या एकाही खेळाडूची निवड झाली नव्हती. यावेळी मदनेबरोबरच राखीव खेळाडूत काशिलिंग आडकेचाही समावेश करण्यात आला आहे. या संघांचे सराव शिबीर ५ ते २१ सप्टेंबर या कालावधीत साई सेंटर भोपाळ येथे होणार आहे. २३ सप्टेंबरला हे संघ कोरियाला रवाना होतील.पुरुष संघ : राकेश कुमार, सूरजितसिंग, नवनीत…

Read More

loading