“छत्रपती शिवाजी महाराज चषक” स्पर्धेत यजमान सांगली ची विजयी सलामी.

“छत्रपती शिवाजी महाराज चषक” स्पर्धेत यजमान सांगली ची विजयी सलामी.

छत्रपती शिवाजी महाराज चषक वरिष्ठ पुरुष व महिला गट आंतर राज्य कबड्डी स्पर्धा-२०१८ स्पर्धेला काळपासून सुरुवात झाली. क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र राज्य कबड्डी असो. यांच्यावतीने सांगली जिल्हा कबड्डी असो. “छत्रपती शिवाजी महाराज चषक वरिष्ठ पुरुष व महिला गट आंतर राज्य कबड्डी स्पर्धेचे” आयोजन मा. आ जयंतराव पाटील यांनी केले.

काळ (२० डिसेंबर) ला स्पर्धेचं उद्घाटन थाटात संपन्न झाला. इस्लामपूर शहरातून सर्व संघाची भव्य रॅली काढण्यात आली होती. ढोल ताश्या पथक मिरवणुकीत सहभागी झाले होते. मा. ना सदाभाऊ खोत यांच्या हस्ते उद्घाटन झाले. आंतरराष्ट्रीय खेळाडू नितीन मदने यांनी स्पर्धेची खेळाडू सोबत शपथ घेतली.

उद्घाटन कार्यक्रम मुळे कालच्या दिवसाचे सामने सुरू व्हायला उशीर झाला. पहिले चार सामने सुरू झाले पण खेळाडूंना आपला खेळ दाखवण्यासाठी वातावरण योग्य नव्हते. सर्व स्पर्धा मॅट वर आहेत. उशिरा सामने सुरू झाल्यामुळे मैदानावर दव पडला. खेळाडूंना दुखापत होऊ नये म्हणून तांत्रिक समितीने निर्णय घेऊन सामने थांबण्यात आले. त्यामुळे तीन मैदानावरील सामने आज सकाळी पुन्हा नव्याने होतील.

पुरुष गटात यजमान सांगली विरुद्ध अहमदनगर यांच्यातील एकच सामना पूर्ण झाला. सांगली संघाने ४६-२७ गुणांनी सामना जिंकत विजयी सलामी दिली. सांगली कडून नितीन मदने व रोहित बने यांनी चांगला खेळ केला. रायगड विरुद्ध बीड हा सामना आज पुन्हा नव्याने खेळवण्यात येईल.

महिला गटात पुणे विरुद्ध सातारा व मुंबई उपनगर विरुद्ध रायगड दोन्ही सामने नव्याने आज सकाळी खेळवण्यात येतील. कालचे राहिलेले सर्व सामने आज खेळवण्यात येतील. तसेच आज सकाळ व संध्याकाळ असे दोन्ही सत्रात सामने होतील.

loading