पहिली महाकबड्डी लीग २०१५

ठाणे टायगर्स – विजेता संघ

ठाणे टायगर्स संघाने पहिल्या महाकबड्डी लीगमधील पुरुष आणि महिला गटाचे विजेतेपद पटकावून डबल धमाका केला.

म्हाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडानगरीत झालेली पुरुष गटाची अंतिम लढत रंगतदार झाली. या लढतीत ठाणे टायगर्स संघाने सांगली रॉयल्सला चुरशीच्या सामन्यात ३८-३६ असा दोन गुणांनी पराभव केला. महेश मगदूम, सागर वडार, आनंद पाटील यांच्या चढाया आणि कृष्णा मदने व रोहित बने यांच्या पकडींच्या जोरावर सांगली रॉयल्सने मध्यंतराला १६-१३ अशी आघाडी घेतली होती. मात्र, मध्यंतरानंतर निलेश साळुंखे, सुरज देसाई, सुरज बनसोडे यांच्या खेळाच्या जोरावर ठाणे टायगर्सने कडवी झुंज दिली व सामन्यातील पिछाडी भरुन काढली. अखेरच्या टप्प्यात ३६-३६ अशी बरोबरी असताना ठाणे टायगर्सचा कर्णधार सचिन पाटीलने कर्णधाराला साजेशी खेळी करत अखेरच्या मिनिटाला सांगली रॉयल्सच्या आनंद पाटीलची पकड घेत टायगर्सला ३७-३६ अशी आघाडी मिळवून दिली. त्यापाठोपाठ सूरज देसाईने शेवटच्या चढाईत एक गुण घेतला आणि टायगर्सच्या विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले .
संघातील खेळांडुचा अल्प परिचय पुढीलप्रमाणे:

१. सचिन पाटील – कर्णधार  – (ठाणे)
२. सुरज देसाई (पुणे)
३. निलेश साळुंखे (ठाणे)
४. सुरज बनसोडे (ठाणे)
५. गणेश बोडके (ठाणे)
६. अनिल पाटील (रायगड)
७. तुषार चव्हाण (पुणे)
८. विनोद अत्याळकर (मुंबई शहर)
९. प्रदीप टक्के (मुंबई शहर)
१०. अजिंक्य यादव (ठाणे)
११. सिध्दार्थ देसाई (पुणे)
१२. योगेश येळे ((मुंबई उपनगर)

मुख्य संघ प्रशिक्षक : डॉ. रमेश भेंडिगिरी (कोल्हापुर)
सहाय्यक संघ प्रशिक्षक : प्रशांत मोकल (रायगड)
संघ व्यवस्थापक : संदिप काणेकर (मुंबई शहर)

loading