१५ वा कबड्डी दिन २०१५

‘कबड्डी’ला आॅलम्पिकची दारे खुली व्हावी- कुलगुरू डॉ़ चोपडे

कै़ साळवी यांच्या कतृर्त्वामुळे भारतात कबड्डीला महत्व मिळाले़ प्राचीन काळात ‘हूतूतू’ नावाचे ओळख असलेल्या या खेळाचे त्यांच्या प्रयत्नाने ‘कबड्डी’त रुपांतर झाले़ सध्या ३५ देशात हा खेळ सुरू आहे़ आणखी १५ देशांत हा खेळ सुरू झाल्यास आॅलम्पिकची दारे खुली होतील़ आॅलम्पिकमध्ये या खेळाचा समावेश होण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे़ असे झाल्यास महाराष्ट्राच्या दृष्टीने ही मोठी घटना ठरू शकेल, असे प्रतिपादन डॉ़ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ़ बी़ ए़ चोपडे यांनी केले़.

कबड्डी महर्षी शंकरराव (बुवा) साळवी यांच्या जन्मदिन अर्थात कबड्डी दिनाचे औचित्य साधत महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन, जालना जिल्हा कबड्डी असोसिएशन आणि निर्मल क्रीडा व समाज प्रबोधन ट्रस्ट यांच्या


संयुक्त विद्यमाने १५ वा कबड्डी दिन सोहळा बदनापूर येथील —

महाविद्यालयात पार पडला़ डॉ़ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ़ बी़ ए़ चोपडे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले़ अध्यक्षस्थानी माजी आ़ किशोर पाटील होते़ व्यासपीठावर आयोजक दत्ताभाऊ पाथ्रीकर, जालना जि़प़ अध्यक्ष तुकाराम जाधव, माजी आ़ अरविंद चव्हाण, तहसीलदार बालाजी क्षिरसागर, किशोर अग्रवाल, शशांक कदम, सिध्दार्थ मेहता, यांची व्यापीठावर प्रमुख उपस्थिती होती़ डॉ़ चोपडे म्हणाले, कबड्डी खेळ महाराष्ट्राच्या मातीतला आहे़ देशात २६ राज्यामध्ये हा खेळ पोहचला आहे़ राष्ट्रीय एकात्मता खेळाच्या माध्यमातून दिसते़ अनेक गुणवंत खेळाडू आपल्याकडे आहेत़ त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सर्वांनीच पुढाकार घ्यायला हवा़ गुणवंत खेळाडूंना विद्यापीठ आगामी काळात दत्तक घेणार आहे़ येत्या डिसेंबर महिन्यामध्ये महा-कबड्डी स्पर्धा होत आहे़ यासाठी विद्यापीठाचे मैदान मोफत उपलब्ध करून देणार असल्याची घोषणा कुलगुरू डॉ़ चोपडे यांनी केली़ तर या खेळाचे एकत्रीकरण करण्यासाठी बुवा साळवी यांनी पायाला भिंगरी लावून कबड्डीची बांधणी केली़ देश पातळीवर सर्वजण एकत्र यावे, यासाठी त्यांनी खेळाचे एकत्रिकरण केले़ महाराष्ट्राने या खेळाला प्रतिष्ठा मिळवून दिली़ प्रसार-प्रचार झाल्याने या खेळात अन्य राज्य बाजी मारत आहे़ ही आनंदाची बाब असल्याचे अध्यक्षीय समारोपात माजी़ आ़ किशोर पाटील म्हणाले़ ग्रामीण भागातील खेळाडूंनी कबड्डी जीवंत ठेवली आहे़ कबड्डी महर्षी बुवा हे मराठवाड्यामध्ये असोसिएशन स्थापन करणारे पहिले खेळाडू होते़ त्यांच्या प्रेरणेने स्नेह विकास मंडळामुळे मराठवाड्यातील खेळाडू घडले़ जुन्या खेळाडूंची सर्वांना ओळख व्हावी, त्यांचा सन्मान व्हावा यानिमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे प्रास्ताविक करताना दत्ताभाऊ पाथ्रीकर यांनी सांगितले़.


यांचा करण्यात आला सत्कार-
राष्ट्रीय स्पर्धेतील सहभागी खेळाडू किशोर मुले: रोहित पाटील (कोल्हापूर), ज्ञानेश्वर डुकरे (परभणी), शुभम पाटील (कोल्हापूर), मुली-सोनाली हेळवी (सातारा), आरती बोडके(पुणे), श्रुती जाडर (नाशिक), कुमार मुले – सुनील सिध्दगवळी (पुणे), आकाश गोजारे (मुंबई शहर), रवींद्र कुमावत (सांगली), मुली- सोनाली शिंगटे (मुंबई शहर), सत्यवा हळदकेरी (पुणे), सायली जाधव (मुंबई उपनगर), किशोर गट राज्य अजिंक्यपद स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू किशोर मुले- ज्ञानेश्वर खिल्लारे (परभणी), काजल इंगळे (सातारा), खुला गट राष्ट्रीय स्पर्धेतील खेळाडू स्व़ मधू पाटील पुरस्कार (उत्कृष्ट खेळाडू)- महेंद्रसिंग राजपूत (धूळे), स्व़ अरूणा साटम पुरस्कार (उत्कृष्ठ महिला खेळाडू)-किशोरी शिंदे (पुणे), मल्हारी बावचकर पुरस्कार (उत्कृष्ठ पुरूष कबड्डीपटू) विकास काळे (पुणे), जेष्ठ कार्यकर्ता पुरस्कार द्वारकादास पार्थ्रीकर, ज्येष्ठ पंच भीमराव गायकवाड (सोलापूर), सर्वोत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार- प्रशांत केणी, विजय चवरकर, जेष्ठ कबड्डी संघटक कृतज्ञता पुरस्कार- बबन लोकरे (उस्मानाबाद), सातत्यपूर्वक कबड्डी स्पर्धा आयोजक संस्था- पांचगणी व्यायाम मंडळ, पांचगणी, सातारा़, यांच्यासह महाकबड्डी अंतिम विजेत्या संघाचे मालक शिवाजी पाटील, कृष्णा दादू पाटील, प्रशाांत जाधवर, यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला़.


महाराष्ट्र राज्य कबड्डी असो.च्या विद्यमाने कबड्डी महर्षी शंकरराव (बुवा) साळवी यांचा जन्मदिन “कबड्डीदिन” म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने कबड्डी या खेळात  महाराष्ट्राकरिता गौरवास्पद कामगिरी करणाऱ्या खेळाडू, पंच, कार्यकर्ते, संघटना आदीना अमृत कलश, शाल व श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात येते, तर किशोर व कुमार मुला-मुलींना रोख रकमेच्या स्वरुपात शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते.यंदाचा हा 15वा “कबड्डीदिन” जालना जिल्हा कबड्डी असो.च्या यजमानपदाखाली निर्मल क्रीड़ा समाज प्रबोधन ट्रस्टच्यावतीने दि.15जुलै 2015 रोजी दुपारी 12-30वा. आर्टस्; सायन्स आणि कॉमर्स कॉलेज सभागृह, बदनापुर, जालना येते आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्ताने प्रथमच सन् 1962 ते 72या कालावधितील मराठवाड्यातील जेष्ठ कबड्डी खेळाडूंचा सत्कार संयोजकांच्यावतीने होणार आहे.

महाराष्ट्र राज्य कबड्डी असो.चे विद्यमान अध्यक्ष मा.श्री. किशोर पाटिल या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील;तर प्रमुख पाहुणे म्हणून ड़ॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाड़ा विद्यापीठाचे कुलगुरु ड़ॉ.चोपड़ा, जालना जिल्हा परिषदेचे अध्यक्ष तुकाराम जाधव, औरंगाबाद महानगर पालिकेचे महापौर त्रिम्बक तुपे, उपमहापौर प्रमोद राठोड़, साई- औरंगाबादचे उप-संचालक विरेन्द्र भांडारकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. हां कार्यक्रम यशस्वी करण्याची आर्थिक जबाबदारी जिल्हा असो.चे सचिव रमेशचंद तवरावाला यांनी उचलली आहे. कार्यक्रमाच्या अधिक माहिती करिता डॉ.दत्ता पाथ्रीकर-9423778779, बाळासाहेब पाटोले-9423458058 यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा.या समारंभास कबड्डी परिवारातील सदस्यानी जास्तीसजास्त संखेने आवश्य उपस्थित राहून हा “कबड्डीदिन” साजरा करण्यास संयोजन समितीला सहकार्य करावे व सत्कारमूर्तीना प्रोत्साहित करावे अशी विनंती एका पत्रकाद्वारे राज्य संघटनेचे प्रभारी सचिव प्रा.संभाजी पाटिल यांनी केली आहे.


राज्य कबड्डी संघटनेचे पुरस्कार जाहीर करण्यात आले असून, धुळ्याच्या महेंद्रसिंग राजपूत आणि पुण्याच्या किशोरी शिंदेला उत्कृष्ट खेळाडू पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. उत्कृष्ट पकडपटू म्हणून पुण्याच्या विकास काळेची निवड करण्यात आली आहे. ‘लोकसत्ता’चे प्रशांत केणी यांना ज्येष्ठ पत्रकार पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. कबड्डी महर्षी शंकरराव (बुवा) साळवी यांचा जन्म दिन कबड्डी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. यंदा हा दिन जालना येथे साजरा करण्यात येणार आहे. त्या वेळी या पुरस्कारांचे वितरण होणार आहे. मंगलकलश, शाल आणि श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

सविस्तर पुरस्कार यादी
बाबाजी जामसंडेकर, मुकुंद जाधव, महर्षी शंकरराव (बुवा) साळवी यांच्या स्मरणार्थ शिष्यवृत्ती
किशोर मुले- रोहित पाटील, ज्ञानेश्वर डुकरे, शुभम पाटील
किशोर मुली- सोनाली हेळवी, आरती बोडके, श्रुती जाडर
कुमार मुले- सुनील सिद्धगवळी, आकाश गोजारे, रवींद्र कुमावत
कुमार मुली- सोनाली शिंगटे, सायवा हळदकेरी, सायली जाधव.
जगन्नाथ चव्हाण यांच्या आईवडिलांच्या स्मरणार्थ शिष्यवृत्ती
किशोर मुले- ज्ञानेश्वर खिलारे, किशोर मुली- काजल इंगळे
मधू पाटील स्मृती पुरस्कार (उत्कृष्ट पुरुष खेळाडू)- महेंद्रसिंग राजपूत
अरुणा साटम स्मृती पुरस्कार (उत्कृष्ट महिला खेळाडू)- किशोरी शिंदे
मल्हारी बावचकर पुरस्कार (उत्कृष्ट पुरुष पकडपटू)- विकास काळे
ज्येष्ठ कार्यकर्ता- द्वारकादास पाथ्रीकर
ज्येष्ठ पंच- भीम गायकवाड
ज्येष्ठ पत्रकार- प्रशांत केणी
कृतज्ञता पुरस्कार- बबनराव लोकरे
सातत्यपूर्ण कबड्डी स्पर्धा आयोजक संस्था- पाचगणी व्यायाम मंडळ
राज्य अजिंक्यपद स्पर्धेतून प्रथम जिल्हा संघ- पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशन
उत्कृष्ट स्पर्धा आयोजक संस्था- पुणे महानगरपालिका, पुणे
कबड्डी दिन आयोजक संस्था- निर्मल क्रीडा समाज प्रबोधन ट्रस्ट, जालना
महाकबड्डी अंतिम संघाचे मालक- ठाणे टायगर्स (पुरुष आणि महिला)

loading