महाराष्ट्र कबड्डी संघटनेचे नवीन पंच मंडळ जाहीर

मनोहर इंदुलकर अध्यक्ष, शशिकांत राऊत सचिव. ——————

महाराष्ट्र राज्य कबड्डी असो. ने  कार्यकारी मंडळ व शासकीय समितीच्या उर्वरीत कालावधीकरीता राज्य संघटनेच्या “पंच मंडळाची” पुर्नरचना केली. पंच मंडळाच्या अध्यक्षपदी मनोहर इंदुलकर यांची तर सचिवपदी शशिकांत राऊत यांची नवीन नियुक्ती करण्यात आली.इंदुलकर हे मुंबई शहर कबड्डी असो.चे विद्यमान कार्याध्यक्ष असून पंच मंडळाच्या कार्याचा त्यांचा अनुभव फार मोठा आहे. राज्य संघटनेच्या पंच मंडळाचे सचिव म्हणून देखिल काही वर्षापूर्वी त्यांनी यशस्वीपणे कार्यभार सांभाळला होता.

राऊत हे देखिल गेली तीन दशकांपेक्षा जास्त काळ या क्षेत्रात कार्यरत असून गेली पंचवीस वर्ष ते राज्य संघटनेच्या प्रसिध्दी विभागाचे काम यशस्वीपणे हाताळत आहेत.त्यांच्या कामाची व प्रामाणिकपणाची दखल घेत राज्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्यावर ही महत्वाची जबाबदारी सोपविली आहे. पंच मंडळाचे इतर सदस्य पुढीलप्रमाणे.१)अजित पाटील- कोल्हापुर, २)गजानन मोकल-रायगड, ३)सुरेश तरे- ठाणे,४)दिनेश चव्हाण-सिंधुदुर्ग, ५)प्रा.नवनाथ लोखंडे-हिंगोली, ६)प्रा.बी.जे. पाटोले-जालना, ७)एल. के. जाधव-सोलापूर, ८)दत्ता झिंजुरडे-पुणे,९)सतीश उबाले- बीड. महाराष्ट्र राज्य कबड्डी असो.चे प्रभारी सरचिटणीस प्रा.संभाजी पाटील यांनी नवनियुक्त पंच मंडळ व त्याची यादी एका पत्रकाद्वारे प्रसिध्दी माध्यमांकरिता जाहिर केली.

loading