विशेष सर्वसाधारण सभा – २०१६

महाराष्ट्र राज्य कबड्डी असो.च्या आज दि.२६जून रोजी झालेल्या “विशेष सर्वसाधारण ” सभेत राज्य संघटनेचे अध्यक्ष किशोर पाटील यांनी सरकार्यवाहपदी  आस्वाद पाटील (रायगड) यांची तर सहकार्यवाहपदी प्रताप शिंदे यांची अधिकृत घोषणा केली. निवडणूक निर्वाचित अधिकारी श्री भालचंद्र चव्हाण हे गेली १५ दिवस हा कार्यक्रम राबवित होते.दि.१७जून रोजी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी ही निवड बिनविरोध झाली होती,परंतु त्याची अधिकृत घोषणा मात्र आज करण्यात आली.”बुवा साळवी यांनी रायगडचे प्रतिनिधित्व करताना संपूर्ण भारतात आपला दबदबा निर्माण केला होता.त्याचीच पुनरावृत्ती आस्वाद पाटील यांच्या कडून अपेक्षित आहे.”असे आपले मनोगत व्यक्त करताना किशोर पाटील म्हणाले.

आस्वाद पाटील यांनी त्याला उत्तर देताना असे सांगितले की,” सर्वच जिल्हा संघटनाना बरोबर घेऊन भविष्यात कार्य करु.मला महाराष्ट्राच्या कबड्डीचा अनुभव जरी कमी असला तरी आमच्या घराण्यातच कबड्डी रुजलेली आहे.माझे आजोबा प्रभाकर पाटील राज्य कबड्डी संघटनेचे उपाध्यक्ष होते,तर आई मीनाक्षी पाटील(माजी मंत्री)रायगड जिल्ह्यात कबड्डीत सक्रीय आहेत. कबड्डी माझ्या नसानसातच भिणली आहे.त्यामुळे कबड्डीच्या हिताचा विचार करुनच निर्णय घेतले जातील.” तर प्रताप शिंदे यांनी सांगितले की, मी कबड्डीच्या  उत्कर्षासाठी सर्वांशी सहकार्याने वागेण.

या सभेत लोकसत्ताचे क्रीड़ा पत्रकार प्रशांत केणी यांची अखिल भारतीय क्रीड़ा पत्रकार संघटनेच्या कोषाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल,आस्वाद पाटील (सरकार्यवाह) व प्रताप शिंदे (सहकार्यवाह) यांचा अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला. सभेची सुरुवात सहकार्यवाह मुज्जफर अली यांनी प्रास्ताविक करुन केली,तर सुनिल जाधव यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले.

loading