१७ वा कबड्डी दिन २०१७

“खेळाडूंच्या क्रीडा गुणांना वाव देण्याचा पाया बुवा साळवी यांनी रचला. बुवांच्या या सेवेचा गौरव म्हणून आपण कबड्डी दिन साजरा करतो.” असे उदगार महाराष्ट्र कबड्डी दिनाच्या निमित्ताने माजी उपमुख्यमंत्री व राज्य कबड्डी संघटनेचे आजीवन अध्यक्ष अजितदादा पवार यांनी काढले. कबड्डीत आज गेहलोत कुटुंबाचा हस्तक्षेप वाढत चालला आहे. कबड्डीच्या निमित्ताने त्या सर्वांचे वर्षभर पर्यटन सुरू असते. यावर विचार करण्याची वेळ आलेली आहे. विचारमंथन हे फक्त कार्यक्रमापूरते असू नये, तर त्याचा पाठपुरावा केला गेला पाहिजे. गेल्या तीन चार वर्षांत कबड्डीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. राष्ट्रीय स्तरावर आपले स्थान काय? आपण यात मागे पडतो की काय? आपला स्तर उंचविण्याची वेळ आलेली आहे. असे पुढे ते म्हणाले. राज्य संघटनेचे अध्यक्ष किशोर पाटील आपल्या प्रास्ताविक भाषणात म्हणाले की, “मी आता थकलो आहे. कबड्डी संघटनेची धुरा आता दादांनी सांभाळावी.” किरण पावसकर म्हणाले की, “राष्ट्रीयस्तरावर महाराष्ट्राचे नाव मोठे करावयाचे असेल तर दादांनी कबड्डी प्रहावात पुन्हा यावयास हवे.” परंतु दादांनी या गोष्टीला व्यवस्थित बगल दिली.
विकास काळे प्रो-कबड्डीच्या सरावात व्यस्त असल्यामुळे या कार्यक्रमास उपस्थित राहू शकला नाही.त्याला स्व. मधुसूदन पाटील पुरस्कार स्वीकारला.तर कोमल देवकरला(उपनगर)  स्व. अरुणा साटम, मंगेश भगत, सायली केरीपाळे (दोन्ही पुणे) यांनी स्व. मल्हारीपंत बावचकर उत्कृष्ट चढाई पुरस्कार, दौलतराव शिंदे (नाशिक),मारुती जाधव(मुंबई),रामचंद्र घोडके(सांगली)यांनी कृतज्ञता, दत्ताराम पारकर(मुंबई),इब्राहिम विजापुरे(सोलापूर),नामदेव तापकीर(पुणे)यांनी जेष्ठखेळाडू, हिराचंद पाटील(रायगड),पांडुरंग शेजुळ(औरंगाबाद) यांनी कार्यकर्ता, लक्ष्मण चव्हाण(बीड),दिगंबर शिंगोटे(पुणे)यांनी क्रीडा पत्रकार,सुरेश जाधव(मुंबई),यशवंत चोंदे(ठाणे) यांनी पंच,तर गुणानुक्रमे पहिला जिल्हा म्हणून पुणे जिल्हा कबड्डी असो.ने पुरस्कार स्वीकारला. हा समारंभ अजितदादा पवार(माजी उपमुख्यमंत्री) सुनील तटकरे(प्रदेशाध्यक्ष- राष्ट्रवादी काँग्रेस),हेमंत टकले,किरण पासकर,किशोर पाटील,दत्ताभाऊ पाथरीकर,आस्वाद पाटील, नाशिक कबड्डीचे अध्यक्ष जाधव व कार्यवाह मोहन पाटील आदींच्या उपस्थितीत हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला.
loading