आशियाई अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा : तेहराण-इराण – २०१७

महाराष्ट्राच्या ३पुरुष व ३महिला खेळाडूंची शिबिराकरिता निवड.
तेहराण-इराण येथे पुढील महिन्यात होणाऱ्या पुरुष व महिला आशियाई अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेकरिता महाराष्ट्राच्या सचिन शिंगाडे, काशिलिंग आडके, रिशांक देवाडीगा यांची पुरुष, तर पूजा शेलार, सायली जाधव, अभिलाषा म्हात्रे यांची महिलांमध्ये प्रशिक्षण शिबिराकरिता निवड करण्यात आली आहे. स्पोर्ट्स ऑथोरिटी ऑफ इंडियाच्या डी. एल. नॉर्दन सेंटर, जी टि. रोड, सोनपत हरियाणा येथे दि.३०ऑकटो. ते १९नोव्हे. २०१७ या कालावधीत हे शिबीर संपन्न होईल. ज्या खेळाडूंची या शिबिराकरिता निवड झाली आहे त्या सर्व खेळाडूंनी ३०ऑकटो. किंवा त्या अगोदर शिबिरास्थळी उपस्थिती राखणे आवश्यक आहे. खेळाडूंनी सोबत आपले पारपत्र व ४ पारपत्रकरिताच्या आकाराचे फोटो घेऊन जावे. अंतिम खेळाडूंची निवड झाल्यानंतर हा निवडलेला पुरुष व महिलांचा संघ दि.१९नोव्हे. रोजी दिल्लीहुन स्पर्धेच्या स्थळी प्रस्थान करेल व दि. २६नोव्हे.रोजी पुन्हा मायदेशी दिल्ली येथे पोहचेल.
loading