• १७ वा कबड्डी दिन २०१७

  “खेळाडूंच्या क्रीडा गुणांना वाव देण्याचा पाया बुवा साळवी यांनी रचला. बुवांच्या या सेवेचा गौरव म्हणून आपण कबड्डी दिन साजरा करतो.” असे उदगार महाराष्ट्र कबड्डी दिनाच्या निमित्ताने माजी उपमुख्यमंत्री व राज्य कबड्डी संघटनेचे आजीवन अध्यक्ष अजितदादा पवार यांनी काढले. कबड्डीत आज गेहलोत कुटुंबाचा हस्तक्षेप वाढत चालला आहे. कबड्डीच्या निमित्ताने त्या सर्वांचे वर्षभर पर्यटन सुरू असते. यावर विचार करण्याची वेळ आलेली आहे. विचारमंथन हे फक्त कार्यक्रमापूरते असू नये, तर त्याचा पाठपुरावा केला गेला पाहिजे. गेल्या तीन चार वर्षांत कबड्डीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. राष्ट्रीय स्तरावर आपले स्थान काय? आपण यात मागे पडतो की काय? आपला स्तर उंचविण्याची वेळ आलेली आहे. असे पुढे…

 • कु. अभिलाषा म्हात्रे यांना राष्ट्रीय मानाचा “अर्जुन पुरस्कार”

  महाराष्ट्राची आघाडीची खेळाडू  कु. अभिलाषा म्हात्रे यांना राष्ट्रीय मानाचा “अर्जुन पुरस्कार” नवी दिल्लीत प्रदान महाराष्ट्राची आघाडीची खेळाडू व नवी मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाच्या क्रीडा अधिकारी आणि आंतरराष्ट्रीय महिला कबड्डीपटू कु. अभिलाषा म्हात्रे यांना केंद्रीय क्रीडा  मंत्रालयाच्या वतीने आज राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून क्रीडा क्षेत्रातील मानाचा “अर्जुन पुरस्कार” भारत देशाचे महामहीम राष्ट्रपती श्री. प्रणव मुखर्जी यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला. श्रीम. अभिलाषा म्हात्रे यांनी सन 2012 च्या महिला विश्वचषक स्पर्धेत तसेच 2014 च्या आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक विजेत्या भारतीय महिला कबड्डी संघात उत्तम खेळ करीत भारत देशाचे प्रतिनिधित्व केले होते. या राष्ट्रीय सन्मानाबद्दल महाराष्ट्र राज्य कब्बडी असोसिएशनचे सर्व पदाधिकारी व सर्व…

 • १५ वा कबड्डी दिन २०१५

  ‘कबड्डी’ला आॅलम्पिकची दारे खुली व्हावी- कुलगुरू डॉ़ चोपडे कै़ साळवी यांच्या कतृर्त्वामुळे भारतात कबड्डीला महत्व मिळाले़ प्राचीन काळात ‘हूतूतू’ नावाचे ओळख असलेल्या या खेळाचे त्यांच्या प्रयत्नाने ‘कबड्डी’त रुपांतर झाले़ सध्या ३५ देशात हा खेळ सुरू आहे़ आणखी १५ देशांत हा खेळ सुरू झाल्यास आॅलम्पिकची दारे खुली होतील़ आॅलम्पिकमध्ये या खेळाचा समावेश होण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे़ असे झाल्यास महाराष्ट्राच्या दृष्टीने ही मोठी घटना ठरू शकेल, असे प्रतिपादन डॉ़ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ़ बी़ ए़ चोपडे यांनी केले़. कबड्डी महर्षी शंकरराव (बुवा) साळवी यांच्या जन्मदिन अर्थात कबड्डी दिनाचे औचित्य साधत महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन, जालना जिल्हा कबड्डी असोसिएशन आणि निर्मल क्रीडा व समाज प्रबोधन ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने १५…

 • पहिली महाकबड्डी लीग २०१५

  ठाणे टायगर्स – विजेता संघ ठाणे टायगर्स संघाने पहिल्या महाकबड्डी लीगमधील पुरुष आणि महिला गटाचे विजेतेपद पटकावून डबल धमाका केला. म्हाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडानगरीत झालेली पुरुष गटाची अंतिम लढत रंगतदार झाली. या लढतीत ठाणे टायगर्स संघाने सांगली रॉयल्सला चुरशीच्या सामन्यात ३८-३६ असा दोन गुणांनी पराभव केला. महेश मगदूम, सागर वडार, आनंद पाटील यांच्या चढाया आणि कृष्णा मदने व रोहित बने यांच्या पकडींच्या जोरावर सांगली रॉयल्सने मध्यंतराला १६-१३ अशी आघाडी घेतली होती. मात्र, मध्यंतरानंतर निलेश साळुंखे, सुरज देसाई, सुरज बनसोडे यांच्या खेळाच्या जोरावर ठाणे टायगर्सने कडवी झुंज दिली व सामन्यातील पिछाडी भरुन काढली. अखेरच्या टप्प्यात ३६-३६ अशी बरोबरी असताना ठाणे टायगर्सचा…

ठळक बातमी

आशियाई अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा : तेहराण-इराण – २०१७

महाराष्ट्राच्या ३पुरुष व ३महिला खेळाडूंची शिबिराकरिता निवड. तेहराण-इराण येथे पुढील महिन्यात होणाऱ्या पुरुष व महिला आशियाई अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेकरिता महाराष्ट्राच्या सचिन शिंगाडे, काशिलिंग आडके, रिशांक देवाडीगा यांची पुरुष, तर पूजा शेलार, सायली जाधव, अभिलाषा म्हात्रे यांची महिलांमध्ये प्रशिक्षण शिबिराकरिता निवड करण्यात आली आहे. स्पोर्ट्स ऑथोरिटी ऑफ इंडियाच्या डी. एल. नॉर्दन सेंटर, जी टि. रोड, सोनपत हरियाणा येथे दि.३०ऑकटो. ते १९नोव्हे. २०१७ या कालावधीत हे शिबीर संपन्न होईल. ज्या खेळाडूंची या शिबिराकरिता निवड झाली आहे त्या सर्व खेळाडूंनी ३०ऑकटो. किंवा त्या अगोदर शिबिरास्थळी उपस्थिती राखणे आवश्यक आहे. खेळाडूंनी सोबत आपले पारपत्र व ४ पारपत्रकरिताच्या आकाराचे फोटो घेऊन जावे. अंतिम खेळाडूंची निवड…

२९वी किशोर/ किशोरी राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा – अलिबाग

मुं.उपनगर व कोल्हापूर अजिंक्य! कोल्हापूरला समिश्र यश! मुं.उपनगर व कोल्हापूर यांनी ” २९व्या किशोर/किशोरी गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत” किशोर व किशोरी गटाचे अजिंक्यपद पटकाविले. कोल्हापूर दोन्ही गटात अंतिम फेरीत दाखल झाले होते,परंतु त्यांना समिश्र यशावर समाधान मानावे लागले. किशोरी गटात गत विजेते पुणे उपांत्य फेरीत, तर परभणी अंतिम फेरीत पराभूत झाले. अलिबाग-रायगड येथील पी.एन.पी. शैक्षणिक संकुलात झालेल्या मुलींच्या चुरशीने खेळला गेलेल्या अंतिम सामन्यात मुं. उपनगरने कोल्हापूरचे कडवे आव्हान २७-२३ असे मोडून काढत “स्व. सौ.राजश्री चंदन पांडे” फिरता चषक आपल्याकडे खेचून आणला. मध्यांतराला १७-०९अशी भक्कम आघाडी घेणाऱ्या उपनगरला नंतर मात्र कोल्हापुरने चांगलेच झुंजविले. ५मिनिटे शिल्लक असताना २२-१६ अशी…

विशेष सर्वसाधारण सभा – २०१६

महाराष्ट्र राज्य कबड्डी असो.च्या आज दि.२६जून रोजी झालेल्या “विशेष सर्वसाधारण ” सभेत राज्य संघटनेचे अध्यक्ष किशोर पाटील यांनी सरकार्यवाहपदी  आस्वाद पाटील (रायगड) यांची तर सहकार्यवाहपदी प्रताप शिंदे यांची अधिकृत घोषणा केली. निवडणूक निर्वाचित अधिकारी श्री भालचंद्र चव्हाण हे गेली १५ दिवस हा कार्यक्रम राबवित होते.दि.१७जून रोजी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी ही निवड बिनविरोध झाली होती,परंतु त्याची अधिकृत घोषणा मात्र आज करण्यात आली.”बुवा साळवी यांनी रायगडचे प्रतिनिधित्व करताना संपूर्ण भारतात आपला दबदबा निर्माण केला होता.त्याचीच पुनरावृत्ती आस्वाद पाटील यांच्या कडून अपेक्षित आहे.”असे आपले मनोगत व्यक्त करताना किशोर पाटील म्हणाले. आस्वाद पाटील यांनी त्याला उत्तर देताना असे सांगितले की,” सर्वच जिल्हा संघटनाना…

महाराष्ट्र कबड्डी संघटनेचे नवीन पंच मंडळ जाहीर

मनोहर इंदुलकर अध्यक्ष, शशिकांत राऊत सचिव. —————— महाराष्ट्र राज्य कबड्डी असो. ने  कार्यकारी मंडळ व शासकीय समितीच्या उर्वरीत कालावधीकरीता राज्य संघटनेच्या “पंच मंडळाची” पुर्नरचना केली. पंच मंडळाच्या अध्यक्षपदी मनोहर इंदुलकर यांची तर सचिवपदी शशिकांत राऊत यांची नवीन नियुक्ती करण्यात आली.इंदुलकर हे मुंबई शहर कबड्डी असो.चे विद्यमान कार्याध्यक्ष असून पंच मंडळाच्या कार्याचा त्यांचा अनुभव फार मोठा आहे. राज्य संघटनेच्या पंच मंडळाचे सचिव म्हणून देखिल काही वर्षापूर्वी त्यांनी यशस्वीपणे कार्यभार सांभाळला होता. राऊत हे देखिल गेली तीन दशकांपेक्षा जास्त काळ या क्षेत्रात कार्यरत असून गेली पंचवीस वर्ष ते राज्य संघटनेच्या प्रसिध्दी विभागाचे काम यशस्वीपणे हाताळत आहेत.त्यांच्या कामाची व प्रामाणिकपणाची दखल घेत राज्य…

Team for 42nd Junior National Kabaddi Championsihp

42nd Junior National Kabaddi Championsihp Boy’s Team – Click here Girl’s Team – Click here Saurabh Subhash Mohite Neha Ramchandra Sanglikar  

loading