अहमदाबाद (गुजरात) येथे होणाऱ्या ३६ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राचे पुरुष व महिला संघ पात्र ठरल्याने महाराष्ट्र राज्याच्या संभाव्य कबड्डी संघाचे सराव शिबीर महाळुंगे बालेवाडी येथील श्री छत्रपती शिवाजी क्रीडा संकुलमधील वेटलिफ्टिंग हॉलमध्ये   आयोजित केले आहे. या सराब शिबिरीचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे सरकार्यवाह अॅड. आस्वाद पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र ऑलंपिक असोसिएशनचे महासचिव नामदेव शिरगावकर, महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या उपाध्यक्षा शकुंतला खटावकर, सदस्य बाबुराव चांदेरे, मुख्याधिकारी सचिन भोसले, क्रीडा व युवक संचालनालयाचे उपसंचालक सुहास पाटील. पुणेजिल्हा कबड्डी असोसिएशनच्या कार्याध्यक्षा वासंती बोर्डे, सरकार्यवाह राजेंद्र आंदेकर, आंतरराष्ट्रीय पंच दत्तात्रय झिंजुर्डे, सहकार्यवाह योगेश यादव, दत्ता कळंबकर, महिला संघाचे प्रशिक्षक संजय मोकल, पुरुष संघाचे प्रशांत चव्हाण, व्यवस्थापक पठाण आदी उपस्थित होते.