चिपळूण तालुका कबड्डी असोसिएशन व रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या वतीने रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या पंचांचे शिबीर डी. बी. जे. महाविद्यालय चिपळूण येथील सभागृहात रविवार दि. ११/०९/२०२२ रोजी संपन्न झाले. या प्रसंगी महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे सह कार्यवाह श्री. रवींद्र देसाई यांच्या उपस्थितीत राज्य पंच मंडळाचे अध्यक्ष श्री. विश्वास मोरे यांच्या मार्गदर्शना खाली पार पडले. या प्रसंगी राज्य पंच मंडळाचे सदस्य श्री. सदानंद मांजलकर व श्री. सुहास पाटील यांचे मार्गदर्शन सुद्धा शिबिरार्थींना लाभले. शिबीर प्रसंगी मुंबई शहरचे कार्याध्यक्ष श्री मनोहर इंदुलकर व श्री. प्रतापराव शिंदे मुंबई उपनगर पदाधिकारी तसेच महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन माजी सह कार्यवाह यांची विशेष उपस्थिती लाभली. शिबीर प्रसंगी जिल्हा कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष श्री. सचिन कदम तसेच जिल्हा पदाधिकारी व तालुका पदाधीकार्यांची हि उपस्थिती लाभली. शिबीर करिता १०० हुन अधिक सामनाधिकारी उपस्थित होते.