महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनची सल्लागार समिती व कार्यकारणीची बैठक विधान भवनात कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष मा. श्री. अजित दादा पवार यांच्या अध्यक्षते मध्ये संपन्न झाली. बैठकीत राज्य कबड्डी असोसिएशनचे कार्याध्यक्ष मा. खा. श्री. गजानन कीर्तिकर, उपाध्यक्ष मा. खा. श्री सुनील तटकरे, व श्री. अमरसिंह पंडित, खजिनदार श्री. मंगल पांडे, सर कार्यवाह श्री. आस्वाद पाटील, सह कार्यवाह श्री. रवींद्र देसाई, श्री. मनोज पाटील, श्रीमती स्मिता जाधव, सदस्य श्री. बाबुराव चांदेरे, श्री. नितीन बर्डे, श्रीमती लीना कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.